भायखळा प्राणिसंग्रहालयात रौप्य महोत्सवी फ्लॉवर शो सुरू

भायखळा येथील प्रदर्शनात सुमारे ५० पेक्षा अधिक वृक्षसंवर्धन संस्थांचा सहभाग आहे. झाडे, फुले, फळे आणि भाज्यांचे प्रदर्शन ५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी विनाशुल्क खुले आहे. या प्रदर्शनात माझी मुंबई या संकल्पनेतील विविध पुरातन वास्तूंच्या प्रतिकृती यामध्ये मुंबई विद्यापीठ, सीएसएमटी स्टेशन, जुनी ट्राम, बेस्ट बस तसेच म्हातारीचा बुट यासारख्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच फळझाडे, फळभाज्या, परड्या, टोपल्या, कुंड्यांमध्ये वाढविलेली मोसमी/हंगामी फुलझाडे, कुंड्यांमधील झाडे, गुलाब, वेली, झुलत्या परडीतील झाडे, शोभिवंत झाडे, औषधी व सुगंधी वनस्पती, बागेतील निसर्गरचना, कलात्मक पुष्परचना आदी संकल्पना साकारण्यात आल्या आहेत.

31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पुष्प प्रदर्शन आयोजित केले आहे.

या प्रदर्शनात शोभिवंत फुलांचा आणि झाडांच्या कुंडयांची आकर्षक मांडणी समावेश आहे, पाने-फुले वापरुन तयार केलेल्या विविध पुष्प रचना लक्ष वेधून घेत आहेत.

पुष्प प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना, रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started